सिटी न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट गटशिक्षणाधिकारींचा शिक्षकांना कठोर इशारा

धारणी तालुक्यातील काही अतिदुर्गम गावांमधील जिल्हा परिषद शाळा उघडण्यात झालेल्या उशिराविरोधात सिटी न्यूज धारणी प्रतिनिधी संदीप राऊत यांनी प्रकाशित केलेल्या बातमीने प्रशासन हलवून सोडले आहे. या बातमीनंतर गटशिक्षणाधिकारी श्री. वरघट यांनी आज तातडीने बैठक घेऊन सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की —
“कोणत्याही परिस्थितीत शाळा वेळेवर उघडलीच पाहिजे. शिक्षक उपस्थित राहिले नाहीत तर कारवाई टाळली जाणार नाही!”
दीवाळी सुटीनंतरचा दुसरा दिवस आणि धारणी तालुक्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह उसळलेला दिसला.
लहान मुले आनंदाने शाळेत दाखल झाली… शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांचे स्वागत करत नवे सत्र नव्या उमेदीनं सुरू केले.
या सर्व घडामोडींमुळे सिटी न्यूजच्या बातमीचा परिणाम किती वेगाने होतो याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे.



