Latest NewsMaharashtra

दोन दिवसांपासून गायब असलेला इसम सापडला मृत अवस्थेत

धारणी शहराला लागून असलेल्या ढाकणा फाट्यावर काल संध्याकाळी एक व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.
मृत व्यक्तीचे नाव हरेराम मावस्कर, वय 45, असे असून तो नांदगाव चुटिया गावातील रहिवासी आहे. हरेराम गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्यांचा शोध परिवाराकडून आणि पोलिसांकडून सुरु होता. मात्र काल संध्याकाळी एका रहदारीतून जाणाऱ्या व्यक्तीने रस्त्याच्या कडेला मोटरसायकल पडलेली आणि जवळच मृतदेह दिसल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर धारणी पोलिस ठाण्याचे ठाणेदार अवतारसिंग चव्हाण आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. प्राथमिक तपासात अपघाती मृत्यू असल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी पोलिसांनी सर्व शक्यता लक्षात घेऊन तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे धारणी परिसरात शोककळा पसरली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button