Latest NewsMaharashtra

बिहार निवडणुका 2025 : पहिल्या टप्प्यात 121 जागांसाठी आज मतदान, तेजस्वी यादव–सम्राट चौधरी आमने-सामने, तर तेज प्रताप यादवची स्वतंत्र लढत

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज 121 जागांसाठी मतदान सुरू आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली असून मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.

या टप्प्यात राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य ठरणार आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, तसेच लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेज प्रताप यादव यांच्यात चुरशीची लढत आहे. तेज प्रताप यादव यांनी ‘जनशक्ती जनता दल’ या स्वतंत्र पक्षाची स्थापना करून निवडणूक लढवली आहे.

दरम्यान, गायिका मैथिली ठाकूर या अलीनगर मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आहेत. यावेळी जन सुराजचे प्रशांत किशोर हे देखील चर्चेत आहेत, ज्यामुळे निवडणूक अधिक रंगतदार झाली आहे.

उर्वरित 122 जागांसाठी मतदान 11 नोव्हेंबरला होणार असून 14 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडेल. या निवडणुकीत बिहारच्या राजकारणातील प्रमुख नेत्यांचे भवितव्य ठरणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button