AkolaLatest NewsMaharashtra

पहाटेच्या सुमारास अकोल्यात जेजे मॉलला भीषण आग

अकोला शहरातील कपडा बाजार परिसरात असलेल्या जेजे मॉलला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. सुरुवातीला मॉलमधून धुराचे लोळ बाहेर येताना दिसले, आणि काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केलं. ही आग एवढी प्रचंड होती की काही वेळातच संपूर्ण परिसर धुराने भरून गेला.
घटनेची माहिती मिळताच अकोला अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल दोन ते अडीच तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र 50 ते 60 लाख रुपयांचं मोठं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, पण शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.
घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती, आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. सध्या पोलिस आणि अग्निशमन दलाकडून तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button