मोदी सरकारचा मोठा निर्णय: ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच 2,100 भारतीय शीख भाविक पाकिस्तानात

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अटारी सीमा आणि करतारपूर साहिब कॉरिडॉर बंद केले होते. मात्र, आता मोदी सरकारने मोठा निर्णय घेत गुरुनानक देवजींच्या 556व्या जयंतीनिमित्त शीख भाविकांना पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयानंतर मंगळवारी (4 नोव्हेंबर) सुमारे 2,100 भारतीय शीख भाविक वाघा सीमेमार्गे पाकिस्तानात दाखल झाले.
वाघा सीमेजवळ पाकिस्तान शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष सरदार रमेश सिंग अरोरा, पंजाबचे अल्पसंख्याक मंत्री आणि इतर अधिकाऱ्यांनी भारतीय भाविकांचे स्वागत केले. पाकिस्तान सरकारने या उत्सवासाठी एकूण 2,150 भाविकांना व्हिसा जारी केला आहे. यामध्ये अकाल तख्तचे ज्ञानी कुलदीप सिंह गरगज, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या बीबी गुरिंदर कौर आणि दिल्ली गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे रविंदर सिंह स्वीटा यांचा समावेश आहे.
भाविक लाहोर येथे पोहोचल्यानंतर त्यांना विशेष बसने गुरुद्वारा जन्मस्थान, ननकाना साहिब येथे नेण्यात आले. मुख्य कार्यक्रम आज (5 नोव्हेंबर) रोजी ननकाना साहिब येथे होत आहे. पाकिस्तान सरकारने करतारपूर साहिब आणि ननकाना साहिबसह सर्व धार्मिक स्थळांची प्रकाशमय सजावट केली असून, सुरक्षा आणि आरोग्य व्यवस्था फुलप्रूफ ठेवण्यात आली आहे.
या दहा दिवसांच्या यात्रेदरम्यान भाविक गुरुद्वारा पंजा साहिब (हसन अब्दाल), गुरुद्वारा सच्चा सौदा (फारुखाबाद) आणि गुरुद्वारा दरबार साहिब (करतारपूर) येथे दर्शन घेणार असून, ते 13 नोव्हेंबर रोजी भारतात परततील.
सारांश:



