Latest NewsLaturMaharashtra

महादेव मंदिरात बसवणे पूर्णिमेनिमित्त 1001 दिव्यांचा दीपोत्सव

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधोडा या गावात बसवणे पूर्णिमेनिमित्त महादेव मंदिरात अनोखा दीपोत्सव साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन जाधव परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. मंदिर परिसरात तब्बल 1001 दिवे लावण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून गेला. महादेव मंदिर हे गावातील अत्यंत श्रद्धास्थान असलेले मंदिर आहे. दरवर्षी एकादशी, पौर्णिमा आणि विविध धार्मिक सणांनिमित्त येथे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. या वर्षी बसवणे पूर्णिमेनिमित्त गावातील प्रत्येक वॉर्डमध्येही दिवे लावून देव दिवाळीचा उत्सव साजरा करण्यात आला.
मंदिरातील दिव्यांच्या रोषणाईमुळे संपूर्ण गाव भक्तिभावाने न्हाऊन निघाले. हा उपक्रम पाहण्यासाठी गावातील नागरिक आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महादेव मंदिर नवसाला पावणारे म्हणून प्रसिद्ध असून भक्तगणांचा श्रद्धेचा उत्सव पाहून परिसरातही भक्तिमय वातावरण पसरले होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button