Latest NewsMaharashtra

किरकोळ वादातून भिक्षेकऱ्याला जीवे मारले

नागपूरच्या गंगाबाई दहनघाट समोरील विसावा आश्रय स्थानी दोन भिक्षेकऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. मृत व्यक्तीचं नाव आहे सुरज शंकर मेश्राम, वय ३५ वर्ष, रा. कार्पोरेशन कॉलनी, गंगाबाई घाट, नागपूर. तर आरोपीचं नाव देवराज भजनलाल यादव, वय ३७ वर्ष, रा. वार्ड क्रमांक २, हरई, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश असं आहे. घटनेच्या दिवशी म्हणजेच २५ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास या दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने आरोपी देवराजने सुरजच्या डोक्यावर झाडूच्या लोखंडी दांड्याने वार केले. या मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेला सुरज यास उपचारासाठी मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांनी ३० ऑक्टोबर रोजी त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र पोलीस चौकशी आणि पोस्टमार्टम अहवालावरून मृत्यू हा मारहाणीमुळे झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे कोतवाली पोलिसांनी सपोनि संतोष बोयने यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोउपनि माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button