विद्यापीठात सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम संपन्न

अमरावती – (दि. 31/10/2025) संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात भारताचे प्रथम गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून, तर भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी ‘राष्ट्रीय संकल्प दिवस’ म्हणून संपन्न झाली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी उपस्थितांना ‘राष्ट्रीय एकता दिवस’ व ‘राष्ट्रीय संकल्प दिवसाची’ प्रतिज्ञा देवून सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. कार्यक्रमाला कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. अजय लाड, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, उपकुलसचिव डॉ. सुलभा पाटील, उपकुलसचिव डॉ. दादाराव चव्हाण, उपअभियंता (विद्युत) श्री राजेश एडले तसेच विद्यापीठातील कर्मचारी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते. संचालन तसेच वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्याबद्ददल माहिती प्रभारी जनसंपर्क अधिकारी डॉ. धनंजय पाटील यांनी दिली.



