रिध्दपूर येथे 31 ऑक्टोबर रोजी कथा लेखन व कथाकथन कार्यशाळा, विद्यापीठाच्या महानुभाव अध्यासन केंद्राचा उपक्रम

अमरावती (दि.28.10.2025)- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील महानुभाव अध्यासन केंद्र व विदर्भ साहित्य संघ, नागपूर, शाखा रिध्दपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 31 ऑक्टोबर, 2025 रोजी वाजे·ारी रिध्दपूर येथील सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी मराठी भाषा तथा तत्वज्ञान अध्ययन केंद्र येथे कथा लेखन व कथाकथन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. राजेश लेहकपुरे यांच्या हस्ते होणार असून उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते भूषविणार आहेत. विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. भैय्यासाहेब मेटकर, मार्गदर्शक म्हणून प्रा. चक्रधर कोठी यांची याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
उद्घाटनानंतर दुसरे सत्र कथाकथनचे होणार असून अध्यक्षस्थान डॉ. अण्णा वैद्य भूषविणार आहेत. नागपूर येथील प्रा. उज्ज्वला लोणकर (यादगिरे), अमरावती येथील डॉ. मेघा यादगिरे, डॉ. श्रध्दा काकडे, डॉ. मिनाक्षी भांदकर, डॉ. अर्चना सिरस्कार, कु. अनुष्का जुनघरे, डॉ. निरज काकडे, श्री विनोद तिरमारे यांचा कथाकथनात सहभाग राहणार आहे.
सर्वांनी उपस्थित राहून या एकदिवसीय कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, विदर्भ साहित्य संघ, शाखा रिध्दपूरचे सचिव श्री प्रवीण कवि·ार, महानुभाव अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. महंत सोनपेठकर यांनी केले आहे.



