Latest NewsMaharashtraMaharashtra Politics

निवडणूक आयोगाकडून १२ राज्यांमध्ये मतदार यादी पुनर्परीक्षणाचा दुसरा टप्पा सुरू

निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे, त्यामध्ये १२ राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष मतदार यादी पुनरिक्षणाचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. निवडणूक आयोगाने (ECI) जाहीर केलेल्या माहितीनुसार, विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) या प्रक्रियेचा दुसरा टप्पा १२ राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये २८ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे.
या टप्प्यात अंदमान-निकोबार बेटे, गोवा, पुदुच्चेरी, छत्तीसगड, गुजरात, केरळ, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि लक्षद्वीप या राज्यांचा समावेश आहे. या प्रक्रियेसाठी ५.३३ लाख BLO (Booth Level Officers) आणि ७ लाखांहून अधिक BLAs (Booth Level Agents) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २८ ऑक्टोबरपासून फॉर्म छपाई आणि प्रशिक्षण प्रक्रिया सुरू होईल आणि ती ३ नोव्हेंबरपर्यंत चालेल. त्यानंतर ४ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान घराघरात जाऊन मतदारांची नोंदणी व पडताळणी केली जाणार आहे. ८ डिसेंबर रोजी मसुदा मतदार यादी (Draft Electoral Roll) प्रसिद्ध होईल, आणि ९ डिसेंबर ते ८ जानेवारी २०२६ या काळात नागरिकांना दावे आणि हरकती नोंदविण्याची संधी दिली जाईल. ३१ जानेवारीपर्यंत सुनावण्या पार पडतील, आणि अखेर ७ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार यांनी सांगितले की, आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत दोन दिवसांची बैठक घेतली असून, निवडणूक प्रक्रियेच्या तयारीचा सखोल आढावा घेण्यात आला आहे.
दरम्यान, आसाम राज्यासाठी विशेष पुनरिक्षण वेगळ्या तारखेला जाहीर करण्यात येईल, कारण तेथील विधानसभा निवडणुका २०२६ मध्ये होणार आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button