Latest NewsMaharashtra

मुदखेड मध्ये संतप्त शेतकनी तहसीलदाराची गाडी फोडली

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तहसील कार्यालयासमोर सोमवार दुपारी संतप्त शेतकऱ्यांनी रोष व्यक्त करत मोठा गोंधळ घातला. सरकारी मदतीची, पिकविमा भरपाईची आणि आर्थिक सहाय्याची मागणी करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने एका शेतकऱ्याचा संयम तुटला. “शेतकरी आत्महत्या करतोय आणि अधिकारी मलिदा खातोय हराम***!” – अशा संतप्त शब्दांत त्या शेतकऱ्याने आपला आक्रोश व्यक्त केला.
तहसीलदारांच्या गाडीवर फावड्याने जोरदार प्रहार करत त्याने गाडीचे पुढील काच आणि हेडलाईट फोडले. या दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनीही ‘जय जवान जय किसान’ अशा घोषणा देत रोष व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत शेतकऱ्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून तहसील कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, आर्थिक मदतीचे पैसे अजूनही खात्यात जमा झालेले नाहीत, पिकविमा कंपन्यांकडून प्रतिसाद नाही, आणि शासन अधिकारी दिवाळीत आनंद साजरा करतायत – पण शेतकऱ्याची दिवाळी मात्र अंधारात गेली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button