Latest News

बाल योगी मनोज बाबा यांचे पुलगाव अपघातात निधन

जुना धामणगांवचे सुपुत्र, अध्यात्मिक क्षेत्रातील नावाजलेले बाल योगी संत मनोज बाबा यांचे काल रविवारी अपघाती निधन झाले. मनोज बाबा हे आजनसरा येथे भक्तांच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रमानंतर परतीच्या प्रवासात पुलगावजवळ त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. तत्काळ त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने त्यांच्या अनुयायांमध्ये शोककळा पसरली असून, श्रद्धेचा आणि भक्तीचा आधार स्तंभ गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. मनोज बाबा हे मूळचे जुना धामणगांव येथील असून, लहान वयातच त्यांच्या अंगी असलेल्या दिव्यशक्तीमुळे लोक त्यांना “बाल योगी” म्हणून ओळखू लागले. त्यांच्या चमत्कारांनी अनेकांना जीवनातील संकटांवर मात करण्याची प्रेरणा दिली. यवतमाळजवळील तळेगाव भारी येथे त्यांचा मठ आणि आश्रम आहे. अपघातानंतर त्यांचे पार्थिव जुना धामणगांव येथे आणण्यात आले, जिथे हजारो भक्तांनी डोळ्यांत अश्रू घेऊन आपल्या लाडक्या बाबांचे शेवटचे दर्शन घेतले. पार्थिवावर सजवलेल्या गाडीतून तळेगाव भारीकडे अंत्ययात्रा निघाली असून, भक्तांना दर्शन घेता यावे म्हणून गाडीचे मागील दार उघडे ठेवण्यात आले आहे. या अंत्ययात्रेत हजारो भाविक सहभागी झाले असून, संपूर्ण परिसर “ॐ नमो मनोज बाबाय नमः” या जयघोषाने दुमदुमून गेला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button