Latest NewsMaharashtra
बडनेरा मध्ये 27 वर्षीय उच्चशिक्षित युवतीची संशयास्पद आत्महत्या

बडनेरा – अमरावतीतील बडनेरा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २७ वर्षीय उच्चशिक्षित युवतीचा मृतदेह तिच्या राहत्या घरी संशयास्पद परिस्थितीत आढळला आहे.
मृत युवतीचे नाव रणदीप कौर रियाड असे असून ती एम.एस्सी. पदवीधर होती आणि एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये अध्यापन करत होती.
आज सकाळी घरातील सदस्यांनी ती प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात येताच तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास बडनेरा पोलीस करत आहेत.



