Latest NewsMaharashtraNagpurUncategorized

नीलगगन अपार्टमेंटमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! CCTV मध्ये आरोपी कैद

नागपूर – हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नीलगगन अपार्टमेंटमध्ये दोन दिवसांपासून काही संशयित तरुण चोरट्यांनी रहिवाशांना हैराण केलं आहे. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, हे आरोपी वय वर्षे वीस ते पंचवीस दरम्यानचे असून, रात्री उशिरा अपार्टमेंट परिसरात फिरताना दिसत आहेत. सीसीटीव्ही कॅमेरामध्येही हे आरोपी स्पष्टपणे दिसत आहेत. चोरट्यांनी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सारिका चव्हाण यांच्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र घरात कोणी नसल्याने आणि ताळं न तुटल्याने चोरीचा प्रयत्न अपयशी ठरला. यानंतर आरोपींनी घराबाहेर ठेवलेले महागडे बूट चोरून पसार झाले.
या घटनेमुळे अपार्टमेंटमधील रहिवाशांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. रहिवाशांनी पोलिसांना त्वरित माहिती दिली असून, हुडकेश्वर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. रात्रीच्या वेळी या परिसरात गस्त वाढवण्याची मागणी रहिवाशांनी केली असून, पोलिसांनी लवकरच आरोपींना अटक करण्याचं आश्वासन दिलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button