Festival NewsLatest NewsMaharashtra

धारणी तालुक्यातील सर्वात मोठा घुंगळू बाजार

धारणी तालुक्यातील घुंगळू बाजार या वर्षीही पारंपरिक उत्साहाने सजला. संपूर्ण बाजारपेठेत खेळणी, मिठाई, कपडे आणि हजारो दुकानांचा मेळा पाहायला मिळाला. या ठिकाणी प्रत्येक गावातील गादली नृत्य टोळी आपली पारंपरिक वेशभूषा आणि बासुरी-ढोल ताशा पथकासह रंगारंग नृत्य सादर करतात.
या वर्षी घुंगळू बाजारात लाखो नागरिकांचा सहभाग झाला, पण धारणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक सतीश झाल्टे, पोलीस जमादार पाठक, बंडु चक्रे, पोलीस मिश्रा यांसह शेकडो पोलीस बाजारात नागरिकांची सुरक्षा पाहत होते. या उत्सवात नागरिकांनी आनंद, उत्साह आणि शांततेत दिवाळी नंतरचा पहिला बाजार अनुभवला. विशेष म्हणजे पहील्यांदाच इतक्या मोठ्या संख्येत नागरिकांना सुरक्षिततेची खात्री दिली गेली, हे खरंच कौतुकास्पद ठरले.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button