Latest NewsMaharashtra

दिवाळीच्या दिवशी पलंगावर नागोबाची हजेरी!

दिवाळीच्या शुभदिनी, पाटनसांवगी व वेल्तुर परिसरात अरविंदजी इंगळे हे झोपण्यासाठी आपल्या पलंगावर लेटले होते. परंतु उशीखाली काहीतरी हालचाल जाणवताच त्यांनी तत्काळ पलंग सोडला. संशय आल्याने त्यांनी तत्काळ रोहित कश्यप यांच्या मदतीने खापा येथील प्रसिद्ध सर्पमित्र प्रेम खडसे यांना माहिती दिली. क्षणाचाही विलंब न लावता सर्पमित्र विशाल शेंडे, प्रेम खडसे, हर्षल मोहटे, सौरभ शेंडे आणि मयुर कनोजे घटनास्थळी पोहोचले. पाहणी केली असता — पलंगावर उशी मागे एक अत्यंत विषारी प्रजातीचा नाग साप लपून बसलेला आढळला! सुमारे ४ फूट लांबीचा नाग अत्यंत धोकादायक स्थितीत होता. मात्र सर्पमित्रांनी कौशल्याने त्याला सुरक्षितरीत्या पकडलं आणि प्लास्टिक भरलीमध्ये ठेवून वनविभागाच्या देखरेखीखाली सोडून दिलं. ही संपूर्ण कारवाई खापा वनपरिक्षेत्र अधिकारी विजय गंगावणे, क्षेत्र सहाय्यक यू. पी. बावणे आणि वनरक्षक गोविंदजी मेंढे यांच्या देखरेखीत पार पडली. सर्पअभ्यासक सागर कानफाडे यांनी सांगितले की, “हिवाळ्याची सुरुवात म्हणजे काही साप निद्रावस्थेत जातात, पण याच काळात विषारी घोनस सापांचा मिलनकाळ सुरू होतो. त्यामुळे एका ठिकाणी दोन-तीन साप एकत्र दिसणे अगदी सामान्य आहे.” सर्पमित्रांनी नागरिकांना आवाहन केलंय की “शेतात काम करताना सावधगिरी बाळगा. हातात मोजे आणि पायात बूट वापरा. गवत किंवा कचऱ्यात पाय टाकण्याआधी नीट पाहा! दिवाळीच्या दिवशी मृत्यूशी सामना टळल्यामुळे इंगळे कुटुंबाने सर्पमित्रांचे आभार मानले आणि देवाचेही!

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button