Crime NewsLatest NewsMaharashtra

मुंबईतील काळाचौकीत प्रेमसंबंधातून तरुणीवर जीवघेणा हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई – मुंबईतील काळाचौकी परिसरात एका तरुणीवर जिवघेणा हल्ला झाल्याची आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मनीषा यादव (वय २४) असे मृत तरुणीचे नाव असून, तिच्यावर काळाचौकीतील दत्ताराम लाड मार्गावर सोनू बरई या तरुणाने चाकूने वार करत हल्ला केला होता. गंभीर जखमी अवस्थेत तिला सर जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

हल्ल्यानंतर आरोपी सोनू बरईने स्वतःचा जीव संपवला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मनीषा आणि सोनू यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. सुमारे आठ ते दहा दिवसांपूर्वी दोघांचा ब्रेकअप झाला होता. याच रागातून शुक्रवारी सकाळी सोनूने मनीषावर हल्ला केला. मनीषाने जीव वाचवण्यासाठी जवळच्या नर्सिंग होममध्ये आसरा घेतला, परंतु आरोपी तिच्या मागोमाग तिथे घुसला आणि पुन्हा चाकूने वार केले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मनीषाला टॅक्सीने रुग्णालयात नेण्यात आले, पण ती वाचू शकली नाही.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button