Latest NewsMaharashtraSatara

महिला डॉक्टरनं आयुष्य संपवलं! हातावर लिहिलं आत्महत्येचं कारण, दोन पोलिसांवर गंभीर आरोप

सातारा : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे. आत्महत्येपूर्वी डॉक्टरने आपल्या हातावर काही वाक्ये लिहिली असून, त्यात दोन पोलिस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या घटनेने फलटणसह संपूर्ण जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टरने हातावर लिहिले होते की, “पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांनी माझ्यावर चार वेळा अत्याचार केला, तर पोलीस प्रशांत बनकर यांनी सतत मानसिक त्रास दिला.” या खुलाशानंतर पोलिस आणि आरोग्य विभागात मोठी खळबळ माजली आहे.गेल्या काही महिन्यांपासून डॉक्टर या पोलिस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. वैद्यकीय तपासणीसंदर्भात झालेल्या मतभेदानंतर त्यांच्या विरोधात अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती. चौकशीदरम्यान त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी तक्रार देऊन “माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन,” असा इशारा दिला होता. मात्र त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप सहकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
गुरुवारी रात्री त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. हातावर लिहिलेल्या मजकुरामुळे या घटनेचा तपास गुन्हेगारी स्वरूपात सुरू झाला आहे.
साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, “या घटनेचा सखोल तपास केला जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.”
खासदार सुप्रिया सुळे यांनी ही घटना अत्यंत धक्कादायक आणि लाजिरवाणी असल्याचे म्हटले आणि प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर शिक्षा होण्याची मागणी केली.
सुषमा अंधारे यांनी महिला सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगितले आणि प्रशासनाच्या जबाबदाऱ्यांनी पिळवणुकीसाठी जबाबदार असल्यास, व्यवस्था तपासली जाणे आवश्यक असल्याचे नमूद केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button