gold rateLatest NewsMaharashtra

भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर वाढले

पुणे : भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर पुन्हा वाढले आहेत. आज सोन्याच्या दरात प्रति तोळा ३,८०० रुपयांची वाढ झाली आहे. दिवाळीत काही काळ सोन्याचे दर कमी झाले होते, त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता, मात्र आता हे दर पुन्हा वाढताना दिसत आहेत.
आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ३८० रुपयांनी वाढून १,२५,४६० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ३०४ रुपयांनी वाढून १,००,३६४ रुपये झाले आहेत. २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ३५० रुपयांनी वाढले असून हे १,१५,००० रुपये झाले आहेत, तर ८ ग्रॅम सोन्याचे दर ९२,००० रुपये आहेत. १८ कॅरेट सोन्याचे दर २८० रुपयांनी वाढले असून, १० तोळ्याचा दर ९,४०,००० रुपये आहे आणि ८ ग्रॅमचे दर ७५,२७२ रुपये झाले आहेत.
सोन्याचे दर वाढल्याने खरेदीसाठी सामान्य ग्राहकांच्या खिशावर थोडा फटका बसत आहे, तरीही काही लोकांनी खरेदी सुरू ठेवली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button