Latest NewsMaharashtra

‘घर में गंदगी, मुहल्ला साफ करने चले साहब’; मनपासाठी म्हण ठरली खरी

अमरावती – “अमरावती शहरात गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छता अभियान मोठ्या दिमाखात राबवले जात आहे. मनपा यासाठी लाखो रुपये खर्च करत असल्याचे दावे केले जातात. मात्र, या सर्व दाव्यांची हवा निघाल्याचे चित्र महानगरपालिकेच्याच महत्वाच्या विभाग कार्यालयासमोर दिसून येत आहे. हे दृश्य आहे अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशमन विभाग आणि आपत्कालीन सेवा विभाग कार्यालयाच्या परिसराचे.

ज्या विभागांनी शहराला संकटातून बाहेर काढायचे, त्याच विभागाच्या कार्यालयाच्या आवारात आज घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तुडुंब भरलेल्या गटार लाईन्स, सर्वत्र प्लास्टिक आणि इतर कचऱ्याने भरलेले उघडे कंटेनर आणि त्यामुळे पसरलेली दुर्गंधी… हे विदारक चित्र मनपाच्या ‘स्वच्छता अभियाना’ची पोलखोल करत आहे.

यामुळे केवळ परिसराची सुंदरता बिघडत नाहीये, तर नागरिकांना तीव्र दुर्गंधीचा आणि आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. ही अस्वच्छता रोगराईला आमंत्रण देणारी आहे. मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी पदभार स्वीकारल्यावर ‘स्वच्छतेवर भर राहील’ असे स्पष्ट केले होते. परंतु, त्यांच्या या विधानाला कंत्राटदारांनी आणि निष्क्रिय अधिकाऱ्यांनी अक्षरशः केराची टोपली दाखवली आहे, हे स्पष्ट दिसते.

स्वच्छता योजनांवर लाखो रुपये खर्च होऊनही जर मनपाच्या स्वतःच्या कार्यालयात अशी परिस्थिती असेल, तर संपूर्ण शहरात स्वच्छता कशी असेल, याची कल्पना अमरावतीकर करत आहेत. ‘घरात घाण आणि बाहेर सफाई’ करण्याची मनपाची ही भूमिका अत्यंत निराशाजनक आहे. आता या सर्व अस्वच्छतेची जबाबदारी नेमकी कोणाची, याचा जाब अमरावतीकर विचारत आहेत.”

अमरावती महानगरपालिकेचे स्वच्छता अभियानाचे दावे किती पोकळ आहेत. ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’ या म्हणीप्रमाणे मनपा स्वतःच्या दारातील घाण न पाहता शहर स्वच्छ करण्याचे स्वप्न दाखवत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या अस्वच्छतेबद्दल मनपाचे ठेकेदार आणि संबंधित निष्क्रिय अधिकारी जबाबदार आहेत.

मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी त्यांच्या विधानाची गांभीर्याने नोंद घेऊन, केवळ कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्षात मनपा कार्यालयासह संपूर्ण शहरात युद्ध पातळीवर स्वच्छता मोहीम राबवावी, अन्यथा, जनतेच्या पैशाची होणारी ही उधळपट्टी आणि आरोग्याशी होणारा हा खेळ थांबणार नाही. अमरावतीकरांना स्वच्छ शहर मिळावे, यासाठी आम्ही हा प्रश्न सातत्याने विचारत राहू. तोपर्यंत पाहत रहा…”city news

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button