Latest NewsMaharashtraNashik

रामशेज किल्ल्यावर सकल मराठा परिवाराच्या वतीने भव्य दीपोत्सव

नाशिक – ज्या किल्ल्याने मोगलांना तब्बल साडे सहा वर्षे रोखून ठेवलं तोच रामशेज किल्ला! आज त्याच गडावर स्वराज्याचा दीप पुन्हा प्रज्वलित झाला… १०१ टेंभे, ५१ मशाली, आणि तब्बल 1001 दिव्यांनी सजला संपूर्ण गड! प्रत्येक दिव्यामागे होती स्वराज्यावरील श्रद्धा आणि अभिमान. दुपारी पावणेचार वाजता हजारो शिवप्रेमी पायथ्याशी जमले, आणि गडचढाईचा प्रारंभ झाला! गडावर पोहोचल्यावर झाली साफसफाई, सुंदर रांगोळ्या, आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात —
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची भव्य मिरवणूक निघाली! गडावर ध्वजपूजन, महाद्वार सजविणं,
आणि शिवमूर्तीवर झालेली पुष्पवृष्टी – या साऱ्याने वातावरणात उत्साह आणि भक्तीचा संगम निर्माण झाला!
संध्याकाळ होताच फटाक्यांची आतिषबाजी, ढोल-ताशांचा निनाद, आणि जयघोषांनी संपूर्ण गड दणाणला —
“जय जिजाऊ… जय शिवराय… जय शंभूराजे!”
या दीपोत्सवात शिवचरित्रकार साक्षी ढगे
आणि समाधान हेगडे पाटील यांच्या प्रेरणादायी व्याख्यानांनी
शिवभक्तांची छाती अभिमानाने भरून आली.
लहान थोर, महिला, वृद्ध — सगळ्यांचा एकच संदेश…
“हिंदवी स्वराज्याचा दीप अखंड प्रज्वलित राहो!”
या कार्यक्रमात सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांनीही सक्रिय सहभाग घेत,
गड जिवंत असल्याचं आणि मराठी मनात आजही स्वराज्याचा तेजोदीप पेटलेला असल्याचं दाखवून दिलं.
रामशेज उजळला —
पण खरं पाहता, उजळलं ते मराठी स्वाभिमानाचं प्रतीक!
दीपांच्या प्रकाशात झळाळलेला गड…
आणि स्वराज्याच्या जयघोषात न्हालेला नाशिक जिल्हा —
हेच खरं महाराष्ट्राचं तेज आहे! रामशेज किल्ल्यावरचा दीपोत्सव फक्त एक उत्सव नव्हता,
तर तो होता आपल्या इतिहासाला, संस्कृतीला, आणि स्वाभिमानाला दिलेला अगाध मानाचा मुजरा!

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button