Latest NewsLaturMaharashtra

रामलिंग मुदगड ग्रामपंचायतीचा लाखो रुपयांचा घोटाळा उघड

लातूर – लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड ग्रामपंचायतीतून १५व्या वित्त आयोगांतर्गत तब्बल लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे.
स्मशानभूमीच्या पुलाचे बांधकाम न करता ₹3,09,435 इतकं बिल उचलण्यात आलं. म्हणजेच पूल कागदावर बांधला गेला, प्रत्यक्षात मात्र गायबच!
तसेच, अंगणवाडी मिशन किलबिल प्रकल्पासाठी ₹1 लाखाचे बोगस बिल, शाळा बाला उपक्रमासाठी ₹1.90 लाख, आरोग्य, शिक्षण आणि उपजीविका विभागासाठी ₹4.56 लाख, पाण्याचे पाणी संकलन प्रकल्पासाठी ₹5.50 लाख, आणि स्वच्छता मोहिमेसाठी ₹6.11 लाख अशी बोगस बिले उचलल्याचे सिटी न्यूजच्या तपासात समोर आले आहे. एकूण मिळून तब्बल ₹22 लाखांहून अधिक रक्कम कोणतेही प्रत्यक्ष काम न करता शासन खात्यातून उचलल्याचा गंभीर आरोप आहे.,या सर्व गैरव्यवहाराबाबत नागरिकांनी गट विकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती. त्यावर जिल्हा परिषदेने सात दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते, मात्र आजपर्यंत कोणताही अहवाल सादर झालेला नाही. स्थानिक नागरिकांनी सरपंच आणि ग्रामसेवकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा घोटाळा उजेडात आल्यानंतर आता गावकऱ्यांच्या मनात प्रचंड संताप आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button