Accident NewsLatest NewsMaharashtra

मुंब्रा-दिवा मार्गावर पुन्हा एक अपघात; रेल्वे प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

ठाणे : मुंब्रा-दिवा रेल्वे मार्गावर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून बदलापूरकडे जाणाऱ्या लोकलमधून प्रवास करत असलेल्या ४६ वर्षीय महिला प्रवाशाचा तोल जाऊन ती मुंब्रा स्थानकाच्या पुढे लोकलमधून खाली पडली. गर्दीमुळे महिला दरवाज्याजवळ उभी होती. लोकलचा वेग त्या वेळी क्रॉसिंगसाठी कमी करण्यात आलेला असल्यामुळे, गंभीर दुर्घटना टळली. महिलेच्या पायाला दुखापत झाली असून, इतर महिला प्रवाश्यांच्या मदतीने तिला दिवा स्थानकात सुखरूप उतरवण्यात आले.

ही घटना संध्याकाळी सुमारे ८.१२ वाजण्याच्या सुमारास घडली. संबंधित महिला दादरहून कल्याणच्या दिशेने प्रवास करत होती. लोकलमध्ये आधीच प्रचंड गर्दी असल्यामुळे ती महिला दरवाज्याजवळ उभी होती. मुंब्रा स्थानकातून लोकल सुटल्यानंतर वळणाच्या ठिकाणी गाडीचा वेग कमी करण्यात आला आणि त्याच वेळी डब्यातील गर्दीमुळे तिचा तोल जाऊन ती ट्रॅकवर पडली. सुदैवाने वेग कमी असल्यामुळे ती थोडक्यात बचावली.

मुंब्रा रेल्वे अपघाताला चार महिने उलटूनही रेल्वे प्रशासनाने या मार्गावर कोणतीही ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना केलेली नाही. सध्या केवळ काही ठिकाणी ट्रेनचा वेग तात्पुरता कमी केला जातो, मात्र यामुळे अपघात थांबतील का, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. अपघात टाळण्यासाठी योग्य पायऱ्या न उचलल्यामुळे प्रवाशांना वारंवार जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

प्रवाश्यांची मागणी आहे की, तात्पुरत्या उपायांवर भर न देता प्रशासनाने कायमस्वरूपी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रभावी निर्णय घ्यावेत. अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button