BeedLatest NewsMaharashtra

बीडमध्ये घरफोडीची धक्कादायक घटना – शेतकरी दाम्पत्यावर हल्ला, पाच लाखांहून अधिक मुद्देमाल लंपास

बीड : गेवराई तालुक्यातील सुशी गावात बुधवारी (दि. १५ ऑक्टोबर) रात्री दीडच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत शेतकरी दाम्पत्यावर हल्ला केला. या धाडसी घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी घराचे लोखंडी गेट तोडून आत प्रवेश केला आणि शेतकरी दिलीप निवृत्ती पौळ व त्यांच्या पत्नीला मारहाण करत सुमारे पाच लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

या प्रकरणी वृंदावनी पौळ यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांनी त्यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करत त्यांना व त्यांच्या पतीला मारहाण केली. त्यानंतर घरातील लोखंडी पेटीत ठेवलेले ९ तोळे ८ ग्रॅम सोन्याचे दागिने, १४ भार वजनाच्या दोन चांदीच्या चैन, तसेच नगदी रक्कम चोरून नेली.

या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. गावात अशा प्रकारच्या चोरीच्या घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून स्थानिकांनी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button