Latest NewsMaharashtraNanded

नायगाव तहसीलसमोर हायवा मालकाचा आत्महत्येचा प्रयत्न; दीड लाख देऊनही गाडी न सोडल्याचा आरोप

नायगाव (जि. नांदेड) : नायगाव तहसील कार्यालयासमोर शनिवारी (दि. १८ ऑक्टोबर) दुपारी एक नाट्यमय आणि धक्कादायक घटना घडली. परमेश्वर हंबर्डे नावाच्या वाळू व्यवसायिकाने हातात विषाची बाटली घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याचा आरोप होता की, अवैध वाळू वाहतुकीसाठी तहसीलदार आणि काही दलालांनी हप्त्याच्या नावाखाली दीड लाख रुपये घेतले, तरीही त्याची हायवा गाडी सोडण्यात आली नाही.

या घटनेमुळे संपूर्ण नायगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली. हंबर्डे याने तहसील कार्यालयासमोरच विषाची बाटली घेऊन आत्महत्येचा इशारा दिला. प्रसंगाच्या वेळी मोठी गर्दी जमली होती. काही लोकांनी हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रीत करून तो सोशल मीडियावर शेअर केला, जो काही तासांतच व्हायरल झाला.

घटनेची माहिती मिळताच नायगाव पोलिस स्टेशनचे अधिकारी व नायब तहसीलदार विजय येरवाड घटनास्थळी पोहोचले आणि मध्यस्थी करून प्रसंगावर नियंत्रण मिळवले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सोनालीताई हंबर्डे यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन हंबर्डे यांचे मन परिवर्तन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, हंबर्डे यांच्याकडून नायगाव तहसील कार्यालयातील काही कर्मचारी आणि बिलोली तहसील कार्यालयातील कारकून शेख युनूस यांनी हप्त्याच्या स्वरूपात मोठी रक्कम घेतली होती. त्यानंतर तडजोडीचे दीड लाख रुपये देऊनही वाहन सोडले गेले नाही, यामुळे हंबर्डे संतप्त झाले.

या घटनेनंतर तहसील कार्यालयातील दलालीचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे नायगाव परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. काही तलाठी व कर्मचारी यांची नावे देखील चर्चेत आहेत. व्हिडिओच्या आधारे या प्रकरणातील संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाणार का, की तडजोड करून प्रकरण मिटवले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या वेळी सामाजिक कार्यकर्त्या सोनालीताई हंबर्डे यांनी घटनास्थळी जाऊन हंबर्डे यांचे मत परिवर्तन केले. त्यांनी आणि इतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे अवैध वाळू व्यवसायातील हप्तेखोरी आणि दलाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button