AmravatiLatest News

गो. से. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे वाचन प्रेरणा दिन साजरा

खामगाव – विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव संचालित गो.से. महाविद्यालयात दिनांक 15 ऑक्टोबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती आणि “मिसाईल मॅन” स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त “वाचन प्रेरणा दिन” उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. धनंजय तळवणकर यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. कलाम यांच्या दूरदृष्टी, साधेपणा आणि त्यागमय कार्याचा उल्लेख करून विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावण्याचे व ज्ञानवृद्धीचे महत्त्व पटवून दिले. या प्रसंगी सांख्यिकी विभाग प्रमुख प्रा. डॉ. विद्याधर आठवर, संगणकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अरविंद तायडे, प्रा. निलेश तांबट, प्रा.आशिष पटोकार, प्रा. कीर्ती शहा, प्रा. कीर्ती चोपडे, प्रा. मनीषा तांगडे,  प्रा. डॉ. नीता बोचे. तसेच सहाय्यक ग्रंथपाल मा. संजय गुळभेले उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. देवनंदन अढाऊ यांनी केले. या कार्यक्रमास विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. दादासाहेब बोबडे, सचिव मा. डॉ. प्रशांतजी बोबडे तसेच संचालक मंडळाचे सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.  वाचन प्रेरणा दिनानिमित्त रासेयो स्वयंसेवकांनी व बी.सी.ए. विभागाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन ग्रंथालयाला भेट देऊन विविध ग्रंथांचे अवलोकन केले. ग्रंथालय कर्मचारी श्री. प्रदीप मेटे, कु. कीर्तीमाला टीकार, श्री. प्रशांत सोळंके, श्री. गजानन सुरवाडे, श्री. शिवाजी मुळीक यांनी विद्यार्थ्यांना पुस्तकांची माहिती दिली. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मो. रागीब देशमुख यांनी दिली आहे. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button