Festival NewsLatest NewsMaharashtra

अमरावती बाजारपेठेत दिवाळी खरेदीसाठी नागरिकांमध्ये उत्साह

अमरावती शहरातील प्रमुख बाजारपेठा या दिवाळीच्या निमित्ताने सजलेल्या आहेत. महालक्ष्मी पूजनासाठी नागरिक विविध आकार आणि रंगांच्या लक्ष्मीमूर्तींची खरेदी करत आहेत. सजावटीसाठी रंगीत दिवे, झाडू, आसन आणि छोटे मुर्ती तसेच लक्ष्मीपूजनाची विविध पूजा सामग्री खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या वर्षी, दिवाळीच्या सणात दोन दिवसांचा फरक असल्याने, हिंदी भाषिक नागरिक उद्याची दिवाळी साजरी करणार आहेत, तर मराठी भाषिक नागरिक परवा दिवाळी साजरी करताना दिसत आहेत. संपूर्ण बाजारपेठा उत्साहाने उजळली असून नागरिकांच्या खरेदीतही मोठी वाढ दिसून येत आहे. दिवाळीच्या खरेदीचा उत्साह, सजावटीची रंगत आणि पूजा सामग्रीची गर्दी, या सर्वांनी बाजारपेठेत खास दिवाळीचा अनुभव निर्माण केला आहे.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button