AmravatiHelth CareLatest News

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अमरावती येथे पहिल्यांदा मायक्रोव्हस्कुलर (फ्री फ्लॅप) शस्त्रक्रिया यशस्वी

स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय,( सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल)अमरावती येथे मायक्रोव्हस्कुलर (फ्री फ्लॅप) शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पूर्ण करण्यात आली. अशा प्रकारची शस्त्रक्रिया विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, अमरावती येथे पहिल्यांदा करण्यात आली. सदर रुग्ण हा 32 वर्षीय पुरुष असुन अमरावती येथील रहिवासी आहे. सदर रुग्णाची तोंडाच्या कॅन्सर ची शस्त्रक्रिया करण्यात आली , मात्र कॅन्सर ची शस्त्रक्रिया केल्या मुळे व ओठ व गालाच्या आतील भाग काढण्यात आला त्यामुळे चेहऱ्यावर खड्डा पडला आल्याने रुग्णास आत्मविश्वास कमी होतो अशा वेळी अशा प्रकारची शस्त्रक्रिया करणे त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत होते. कॅन्सर ची शस्त्रक्रिया करतानाच प्लास्टिक सर्जरी व कॅन्सर सर्जरी टीम ने सदर रुग्णाच्या हाताची त्वचा घेऊन ती चेहऱ्याला लावून ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. या शस्त्रक्रियेने रुग्णाचा चेहरा पूर्वीप्रमाणे नॉर्मल दिसतो. आता शस्त्रक्रिया नंतर रुग्णाची प्रकृती चांगली आहे.अशाप्रकारची शस्त्रक्रिया रुग्णालयात पहिल्यांदा करण्यात आली व ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत विनामूल्य करण्यात आली. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, अमरावती येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅन्सर तज्ञ डॉ. अतुल यादगिरे, प्लॅस्टिक सर्जन डॉ. तक्षक देशमुख, बाधिरीकरण तज्ञ डॉ. राखी वानखडे, नोडल ऑफिसर डॉ.अंजु दामोदर,डॉ.माधव ढोपरे, डॉ.माधुरी गाडेकर, डॉ . रोहिणी राठोड ,डॉ किरण परीसे, डॉ.ऐश्वर्या,औषध विभाग योगेश वाडेकर, समाजसेवा अधीक्षक शितल बोंडे, ऋषिकेश धस, डॉ. दिव्यांनी मुंदाने, डॉ. पायल रोकडे, अधिसेविका माला सुरपाम यांच्या सूचनेनुसार इन्चार्ज सिस्टर संगीता आष्टेकर, कविता बेरड, प्रियंका गायकवाड, वैष्णवी मरकाळे, सुमित्रा कोरे, वैभवी कोथळकर, जिमी कांबळे, श्याम चव्हाण, लक्ष्मण वाडुकर, शारदा राठोड, अथर्व लोंढे, प्रगती चिखलकर, जीवन तेलमोरे आदींचे शस्त्रक्रियेत मोलाचे सहकार्य होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button