AmravatiLatest News
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे सर्व कामकाज 20 ते 27 ऑक्टोबर पर्यंत बंद

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सर्व कामकाज दिनांक 20 ऑक्टोबर पासून ते 27 ऑक्टोबर पर्यंत बंद राहणार आहे.
दिनांक 20 ऑक्टोबर रोजी स्थानिक सुटी, 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन, दुस-या दिवशी बलिप्रतिपदा व 22 ऑक्टोबर रोजी भाऊबीज ची शासकीय सुटी आहे. तर दिनांक 22 व 23 फेब्राुवारी, 2025 रोजी विद्यापीठाच्या एकेचाळिसाव्या दीक्षांत समारंभामुळे विद्यापीठाचे सर्व प्रशासकीय व शैक्षणिक विभाग सुरू ठेवण्यात आले होते. सदर तारखेची पर्यायी सुटी दिनांक 24 ऑक्टोबर व 27 ऑक्टोबर रोजी दिवाळीनिमित्त जाहीर करण्यात आली असल्याने विद्यापीठाचे सर्व कामकाज हे 20 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर पर्यंत बंद राहणार आहे, याची सर्वसंबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी केले आहे.



