AmravatiLatest News

विद्यापीठाच्या सोशल मिडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद, कुलगुरूंच्या हस्ते सत्कार

अमरावती (दि.18.10.2025) –  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मिडिया सेलला अवघ्या काही दिवसातच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आहे. जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी यासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे विद्यापीठाचा नावलौकीक वाढत असून कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर व सोशल मिडियाचे काम पाहणारे श्री अनिकेत ठाकरे यांचा कुलगुरू कार्यालयात पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे व कुलसचिव डॉ. अविनाश असनारे उपस्थित होते. सोशल मिडियाच्या कार्यामध्ये जनसंपर्क विभागातील श्री ओम जगताप, सौ. रजनी चपाटे, श्री सुनिल महल्ले, श्री अशोक मोरे, श्री मयूर डांगे, श्री विजय झाडे या सर्वांचे सहकार्य लाभले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button