AmravatiLatest News
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे व कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. जयंती कार्यक्रमाला न.न.सा. चे संचालक डॉ. अजय लाड , आजीवन अध्ययन विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, उपकुलसचिव डॉ. सुलभा पाटील, उपअभियंता ( विद्युत ) श्री राजेश एडले , सहाय्यक कुलसचिव श्री. अनिल मेश्राम तसेच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संचालन व भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्याबद्दल माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी दिली.



