विद्यापीठाच्या हिवाळी — 2025 च्या काही परीक्षांच्या वेळापत्रकात बदलविद्याथ्र्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाव्दारे घेण्यात येणा-या हिवाळी – 2025 च्या लेखी परीक्षेची वेळापत्रके विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहेत. परंतु काही परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये बी.ई.सेमि.-6 (सी.बी.सी.एस.), बी.ए. सेमि.-2 (एन.ई.पी.), बी.पी.ए. सेमि.-1 व 2, बी.कॉम.सेमि.-1 व 2 (एन.ई.पी.)/ बी.कॉम. (ए./एफ) सेमि.-1 व 2 (एन.ई.पी.), बी.एस्सी. सेमि.-1 व 2 (एन.ई.पी.), बी.एस्सी. (गृह विज्ञान) सेमि.-1 व 2 (एन.ई.पी.), बी.पी.ई. अॅन्ड एस. सेमि.-1 व 2 (एन.ई.पी.), डिप्लोमा इऩ बिझिनेस अॅनेलिस्टिक सेमि.-1 व 2 आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फायनान्सियल लिट. कोर्स (एक वर्षीय) या परीक्षांचा समावेश आहे.
यासंदर्भात सर्वसंबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, केंद्राधिकारी, महाविद्यालये, परीक्षा केंद्रांना कळविण्यात आले असून महाविद्यालयांनी तातडीने आपल्या विद्याथ्र्यांना कळवायचे आहे. तरी विद्याथ्र्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता विद्यापीठाच्या वेबसाईटवर परीक्षा विभागाच्या अधिका-यांच्या दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.



