India News

दिवाळीआधीच ग्राहकांना झटका: सोन्याच्या दरांनी गाठला उच्चांक, आजचा प्रतितोळ्याचा भाव

दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांना मोठा आर्थिक झटका बसला आहे, कारण सोन्याच्या दराने आजवरचा सर्वाधिक उच्चांक गाठला आहे. लग्नसराई आणि सणासुदीच्या काळात सोनं खरेदी करण्याची परंपरा असतानाच, वाढत्या दरामुळे सामान्य ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीत भारतात सोन्याची मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. गेल्या काही दिवसांपासून वैश्विक स्तरावर घडणाऱ्या घडामोडी यांनीही सोन्याच्या दरांवर परिणाम होताना दिसत आहे.

दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या आधीच सोन्याच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. इतकंच नव्हे तर चांदीनेदेखील सर्व विक्रम मोडित काढले आहेत. मंगळवारी म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी देशात सोनं-चांदीने नवीन उच्चांक गाठला आहे. तर आर्थिक राजधानी मुंबईत देखील सोनं-चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत.
आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 3,280 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं सोनं 1,28,680 रुपयांवर पोहोचलं आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 3000 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 1,17,950 रुपयांवर पोहोचलं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 2,460 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 96,510 रुपयांवर पोहोचलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button