मालेगाव तालुक्यात ११ गोवंशांची मुक्तता, आरोपी जेरबंद

नाशिक – नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील कळवाडी फाटा परिसरात आज सकाळी धाडसी कारवाई झाली. गोरक्षक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचला. पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
ट्रक क्रमांक MH-43-Y-2471 मध्ये दोरांनी घट्ट बांधून कत्तलखान्याकडे नेण्यात येत असलेल्या ११ गोवंशांची मुक्तता केली गेली.
या धाडसी कारवाईत नदीम खान अरीफखान (रा. कमालपुरा, मालेगाव) याला घटनास्थळीच अटक करण्यात आली.
सध्या या प्रकरणात गुन्हा क्रमांक 734/2025 नोंदवण्यात आला असून, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5, 5A, 5B आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11 अंतर्गत तपास सुरू आहे.
पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी सांगितले, ‘गोरक्षक व बजरंग दलाकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचण्यात आला. ट्रकमधून ११ गोवंशांची मुक्तता झाली असून आरोपी अटकेत आहे. ही कारवाई सर्वांसाठी धडा आहे.’
मालेगाव पोलिस आणि गोरक्षकांची सतर्कता यामुळे ११ निरपराध जनावरांचे जीव वाचलेत, आणि गोवंश तस्करी विरोधातील पोलिसांची ही संयुक्त मोहीम भविष्यातही सुरू राहणार आहे.”



