AmravatiamravatinewsLatest NewsMaharashtra

दुधवाटप करणाऱ्या युवकावर चाकूहल्ला, बुधवारी मृत्यू

अमरावती : अमरावती शहरातील शोभा नगर परिसरात ही घटना घडली. फिर्यादी आकाश नारायणराव कदम, वय ३० वर्ष, राहणारा एम.व्ही. रविभूषण कौलणी व्हीएमव्ही कॉलेज रोड, दुध वाटप व्यवसाय करत होता. दि. ०७ ऑक्टोबर रोजी तो आपले काम संपवून घरी जात असताना एका अज्ञात व्यक्तीने त्याला अडवले आणि त्याच्याशी भांडण केले. घटनेनंतर आरोपीने दोन अज्ञात इसमांना फोन करून बोलावले. या दोघांनी फिर्यादीवर चाकूने हल्ला केला. एक इसमाने पोटावर दोन वार केले, तर दुसऱ्याने पाठीवर चाकू मारले. जखमी झाल्यानंतर, स्थानिक लोकांनी फिर्यादीला इर्विन दवाखान्यात भरती केले. उपचारादरम्यान दुर्दैवाने बुधवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. गाडगेनगर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविला असून सदर प्रकरणात नोंद विधी संघर्षग्रस्त आरोपी ताब्यात असून एका फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button