Latest NewsMaharashtra

दत्तापुर हत्या प्रकरणातील चार आरोपी तात्काळ जेरबंद

दत्तापुर : दत्तापुर पोलीसांनी ७ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास झालेल्या धक्कादायक खुनाचा तात्काळ उलगडा केला. गणेश उर्फ शुभम गजानन वारंगणे (वय २६, रा. नारगांवडी) याला मृत अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला हा मृत्यू अकस्मात झाला असल्याचे नोंदवण्यात आले, परंतु तपासादरम्यान पोलिसांना मृत्यू संशयास्पद असल्याचे आढळले. चौकशीत समोर आले की, मृतक गणेश याच्या आई दुर्गा वारंगणे हिचे मनोज किर्तने (रा. जुना दत्तापुर) याच्याशी प्रेमसंबंध होते, आणि गणेश हा नात्यात अडथळा ठरत असल्याने आरोपींनी त्याला ठार मारण्याचा कट रचला.
या कटात अमोल सुरेश अर्जुने (रा. जुना दत्तापुर) आणि अशोक उर्फ ‘चिवडा’ व्यंकटराव चवरे (रा. नारगांवडी, वय ६५) यांनी त्यांना साथ दिली.
अ‍ॅरस्ट झालेल्या आरोपींनी पोलिस चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. दत्तापुर पोलिसांनी सर्व आरोपींना जेरबंद करून चौकशी केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक गिरीश ताथोड यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button