BeedLatest NewsMaharashtra

बीडमधील दोन धक्कादायक घटना: महिलांवरील अमानुष हल्ला आणि कारागृहातील धर्मपरिवर्तनाचा आरोप

बीड – बीड जिल्ह्यातून समोर आलेल्या दोन धक्कादायक घटनांनी संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली आहे. पहिली घटना अंजनवती गावातील असून, शेतीच्या वादातून एका महिलेला अमानुषपणे मारहाण करून तिचे पाय तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना नेकनुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पीडिता आश्विनी येडे या गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे, या आरोपींकडून याआधीही तीन महिलांवर अशाच पद्धतीने प्राणघातक हल्ले करण्यात आले होते. त्यापैकी एका महिलेवर मारहाण करतानाचा थरारक व्हिडीओ देखील तीन महिन्यांपूर्वीचा समोर आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, पीडित कुटुंबाने आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या नेकनुर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दुसरी धक्कादायक घटना बीड जिल्हा कारागृहातील असून, तिथे कैद्यांना धर्म परिवर्तनासाठी जबरदस्ती केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अ‍ॅडव्होकेट राहुल आघाव यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली की, त्यांच्या पक्षकार असलेल्या चार कैद्यांवर – तीन हिंदू आणि एक मुस्लिम – कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड हे धर्म परिवर्तनाचा दबाव टाकतात. धर्म बदलण्यास नकार दिल्यास, या कैद्यांना मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावे लागते, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे सध्या कारागृहात दहशतीचे वातावरण असून, या प्रकरणी लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचेही अ‍ॅडव्होकेट आघाव यांनी स्पष्ट केले.

या दोन घटनांनी बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित प्रशासन व पोलिस यंत्रणेवर त्वरित आणि कठोर कारवाई करण्याचा दबाव वाढू लागला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button