Latest NewsMaharashtraNanded

दीड वर्षाच्या बालकाचे अपहरण करणारे आरोपी २४ तासांत ताब्यात

नांदेड शहरातील पीरबुऱ्हाण नगर येथील एका मस्जिदी बाहेरून दीड वर्षीय बालकाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली. या अपहरणाची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. घटनेची माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यनगर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास केला आणि पल्सर गाडीवरून आलेल्या दोन युवकांचे संपूर्ण पत्ते ठरवले.
या कारवाईत पोलिसांनी २७ वर्षीय मोहम्मद आमीर आणि त्याचा मित्र मोहम्मद इस्माईल यांना ताब्यात घेतले. बालकाची सुरक्षित सुटका करण्यात आली. तपासात असे समजले की, मोहम्मद आमीर गवंडी काम करतो, तर मोहम्मद इस्माईल हा सराईत गुन्हेगार आहे. हे दोघे खुदबई नगर, नांदेड येथील रहिवासी आहेत. अपहरणाचे कारण शोधण्यासाठी पोलिस तपास करत आहेत. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी या प्रकरणाचा तातडीने आणि यशस्वी तपास केल्याबद्दल भाग्यनगर पोलिसांना दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button