AmravatiLatest NewsMaharashtra

अचलपूर नगरपालिकेत पुन्हा महिलाराज?

अचलपूर नगरपालिका अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठी अ वर्ग नगरपालिका. 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत ही नगरपालिका पूर्णपणे महिला नेतृत्वाखाली गेली होती. त्या वेळी नगराध्यक्ष पद महिला (खुला) प्रवर्गासाठी आरक्षित होतं. या निवडणुकीत तीन पक्षांत चुरशीची लढत झाली होती.
काँग्रेसकडून सौ. अंजुम साजिद फुलारी मैदानात उतरल्या होत्या,
भाजपकडून सौ. सीमा रुपेश ढेपे,
तर
शिवसेनेकडून सौ. सुनिता नरेंद्र फिस्के यांनी उमेदवारी दिली होती.
तीव्र लढतीनंतर सुनिता फिस्के यांनी काँग्रेसच्या अंजुम फुलारी यांना 610 मतांनी पराभूत करून विजय मिळवला. या निवडणुकीत भाजपाच्या सीमा ढेपे यांना तिसरा क्रमांक मिळाला होता.
नगराध्यक्ष म्हणून सुनिता फिस्के यांनी आपल्या कार्यकाळात महिला सक्षमीकरण, नगरपालिकेतील स्वच्छता, आणि मूलभूत सुविधा यावर विशेष भर दिला होता. त्यांच्या काळात अनेक नागरी उपक्रम राबवले गेले, आणि अचलपूरला स्वच्छ नगर या दिशेने पुढे नेण्याचा प्रयत्न झाला.
आता 2025 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा खुला महिला प्रवर्ग आरक्षण जाहीर झाल्याने अचलपूरच्या राजकारणात नव्या चेहऱ्यांची चर्चा रंगली आहे. अनेक जणांचे राजकीय स्वप्न तुटले असले, तरी महिला उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.
राजकीय पटलावर पुन्हा एकदा महिलांचे नेतृत्व पाहायला मिळेल का?
अचलपूर पुन्हा ‘महिलाराज’ पाहणार का?
हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल, पण सध्या तरी नगरपालिकेच्या गल्लीपासून सोशल मीडियापर्यंत महिलांच्या चर्चाच रंगल्या आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button