India NewsLatest News

CJI भूषण गवई यांचा अपमानाबद्दल बौद्ध महासभेचा तीव्र निषेध

सर्वोच्च न्यायालयाचे पहिले दलित न्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्या विरोधात न्यायालयात ब्राह्मणवादी मानसिकतेच्या वकिलाने केलेल्या अनुचित वर्तनाने समाजमन संतप्त झाले आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा आठवडी बाजार शाखा बडनेरा येथे तातडीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत या निंदनीय घटनेचा एकमुखी निषेध नोंदवण्यात आला. तसेच, या प्रकरणावर अधिक तीव्र आंदोलन उभारण्यासाठी पुढील रुपरेषा तयार करण्यात आली. बैठकीत बोलताना सभाध्यक्ष मच्छिंद्र भटकर, सचिव दरीया गायकवाड, तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती चे अध्यक्ष मनोज गजभिये आणि सचिव सिद्धार्थ बनसोड यांनी मनुवादी विचारसरणीविरोधात संताप व्यक्त केला.
त्यांनी स्पष्ट सांगितले की, “दलित समाजातील कोणताही व्यक्ती उच्च पदावर पोहोचला की, सनातनी प्रवृत्ती त्याला सहन करत नाहीत. मात्र आता हा अपमान आम्ही सहन करणार नाही!”
या बैठकीला दत्ता गेडाम, बोरकर काका, सुरेश बनसोड, सतीश भालेराव यांच्यासह एम जी ग्रुप चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या घटनेचा निषेध करताना सर्व वक्त्यांनी सांगितले की, भूषण गवई यांचा अपमान म्हणजे न्यायव्यवस्थेचा, संविधानाचा आणि संसदेसह प्रत्येक आंबेडकरवादी नागरिकाचा अपमान आहे. आता बडनेरा शहरात या घटनेचे पडसाद कसे उमटतात आणि या निषेधाचे रूप आंदोलनात कसे परिवर्तित होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button