Crime NewsLatest NewsMaharashtraNashik

सातपूरमध्ये गोळीबाराची थरारक घटना; भूषण लोंढेसह १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक – नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री उशिरा थेट कायद्याला आव्हान देणारी गंभीर घटना घडली. एका बिअर बारमध्ये झालेल्या वादातून विजय तिवारी (वय २०) या युवकावर गोळीबार करण्यात आला. गोळी त्याच्या मांडीत लागली असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि पोलिसांच्या उपस्थितीत घडल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा मुलगा भूषण लोंढे याच्यासह आठ ओळखीचे आणि चार अज्ञात अशा एकूण १२ जणांविरुद्ध खंडणीसाठी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलीसांनी या प्रकरणात आतापर्यंत भूषण पाटील, दुर्गेश वाघमारे आणि आकाश उर्फ अभिजित डांगळे या तिघांना अटक केली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. गोळीबार केल्याचा आरोप शुभम पाटील उर्फ भुऱ्या याच्यावर असून, प्रिन्स सिंग याने चाकूने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख आणि वरिष्ठ निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपींविरुद्ध ‘मोक्का’ अंतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

पोलीस तपासात उघड झाले आहे की, बारमध्ये होणाऱ्या वादावर तोडगा काढण्यासाठी खंडणीच्या स्वरूपात भागीदारीची मागणी करण्यात आली होती. याच वादातून भूषण लोंढेने गोळीबार केला, अशी माहिती पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी दिली आहे. सातपूर परिसरात गुन्हेगारी वाढत असल्याने अशा घटनांवर तातडीने आणि कठोर कारवाई होण्याची गरज आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button