AmravatiLatest NewsMaharashtra

वेलकम पॉईंट झाला ट्रॅव्हल्सचा अड्डा! आरटीओ आणि पोलिसांच लक्षच नाही कि मुद्दाम दुर्लक्ष?

अमरावती – अमरावती शहरातील वेलकम पॉईंट परिसर सध्या खाजगी ट्रॅव्हल्स व्यवसायिकांसाठी सुवर्ण ठिकाण ठरलं आहे. येथून दररोज खुराणा ट्रॅव्हल्स, संजय ट्रॅव्हल्स, डायमंड, शिवरी, रॉयल, पर्पल, बाबा, चव्हाण ट्रॅव्हल्स आदी अनेक खाजगी बस कंपन्या अविरतपणे ये-जा करत आहेत. या ट्रॅव्हल्समधून प्रवासी सोबतच सामानाचे ओव्हरलोड प्रमाण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नियमांनुसार, प्रवासी वाहनात ठरावीक वजनाचेच सामान वाहून नेता येते, मात्र या ठिकाणी खुलेआम नियमांचा भंग केला जातोय. स्थानिकांनी सांगितलं की, जेव्हा या ट्रॅव्हल्स चालकांना प्रश्न विचारले जातात, तेव्हा ते मुजोरीने उत्तर देतात – “आम्ही पोलीसांना पैसे देतो, आमचं काही कोणी करू शकत नाही!”
सगळ्यात मोठा प्रश्न असा की, आरटीओ विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष का करत आहेत? हे दुर्लक्ष अज्ञानातून आहे का, की मुद्दाम गप्प बसण्याचा करार झाला आहे? सिटी न्यूजने यापूर्वीही या प्रकरणाचे व्हिडिओ, रिपोर्ट्स आणि पुरावे प्रशासनासमोर सादर केले होते. पण अद्यापही कुठलीही कारवाई झाली नाही. दररोज वेलकम पॉईंट परिसरात ट्रॅव्हल्स बस थांबतात, अवैध ओव्हरलोड पार्सल्स घेतात, आणि पोलिसांच्या डोळ्यांसमोरच शहरातून बाहेर पडतात.
हा प्रश्न फक्त वाहतुकीचा नाही, तर सुरक्षेचा आणि कायद्याचा अवमान आहे. अमरावती शहरातील नागरिकांनीही या अवैध व्यवसायावर कारवाईची मागणी केली आहे. मात्र, प्रशासन मात्र मूक प्रेक्षक बनलेलं दिसतं!

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button