Crime NewsLatest NewsMaharashtra

धंतोलीत किरकोळ वादातून तलवारीने हल्ला, आरोपीला अटक

नागपूर – धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने गंभीर रूप धारण केले. या वादात एका व्यक्तीने हातातील तलवार वापरून समोरच्यांवर हल्ला केला. हल्ल्यात पीडित व्यक्ती गंभीर जखमी झाला असून, वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला.
या प्रकरणाची माहिती मिळताच धंतोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोराला तात्काळ ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईची माहिती देताना धंतोली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी सांगितले की, “किरकोळ वादातून तलवारीने हल्ला करणाऱ्या आरोपीला आम्ही अटक केली असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.” पोलीसांनी हल्ल्यात वापरलेली तलवारही जप्त केली असून, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
धंतोली पोलिसांच्या या तात्काळ कारवाईचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button