Crime NewsMaharashtra

दाना मार्केटमध्ये जीवघेणा हल्ला प्रकरणी एकाला अटक

धारणी – धारणी शहरातील दाणा मार्केटमध्ये काल रात्री सुमारे आठ वाजता फाजील अकील बेग यांवर खुणी हल्ला झाला. या गंभीर हल्ल्यात ते मृत्युमुखी पडले. घटना समजताच धारणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अवतारसींग चव्हाण आणि पोलीस उपविभागीय अधिकारी श्री गरुड साहेब यांनी आज सकाळी घटनास्थळी जाऊन संपूर्ण पाहणी केली. पोलिसांनी साक्षीदारांच्या मदतीने सविस्तर माहिती गोळा करीत असून, दाणा मार्केट परिसरातील बैलं व्यापाऱ्यांपासूनही माहिती मिळविण्यात येत आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले असून, घटनास्थळी सि.सी.टी.व्ही. फुटेजची तपासणी सुरु आहे.
तपास अधिक सखोल करण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण दाणा मार्केट परिसरावर लक्ष ठेवले असून, घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची नोंद घेतली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी शक्यतो बाजारपेठेतील किंवा आजूबाजूच्या लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच ताब्यात येऊ शकतात. धारणी पोलीस ह्या घटनेवर कसून तपास करत असून, नागरिकांनी देखील पोलिसांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button