Crime NewsLatest NewsNagpur

ओरिसातून आणलेला 12 किलो गांजा नागपूरमध्ये NDPS पथकाने केला जप्त

नागपूर – नागपूर शहरातील पारडी पोलीस ठाणे हद्दीत “ऑपरेशन थंडर” अंतर्गत NDPS पथकाने अचूक माहितीच्या आधारे कारवाई केली.
घटना 5 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 4 ते 5:30 वाजेच्या सुमारास पारडीतील पाल इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ, भंडारा-नागपूर हायवे नाका नंबर पाच येथे घडली. पथकाने संशयास्पद हालचाल करणाऱ्या दोन युवकांना थांबवून तपासणी केली असता, त्यांच्या वाहनात 12 किलो गांजा आढळून आला. आरोपींनी हा गांजा ओरिसातून नागपूरमध्ये आणला होता, तो ॲल्युमिनियमच्या रॅकखाली लपवण्यात आला होता.

 1.मोहम्मद शारीक मोहम्मद वकील अन्सारी (वय 30, रा. इंदिरा माता नगर, यशोधरा नगर, नागपूर)

 2.मोहम्मद मासूम शेर अली शेख (वय 22, रा. वनदेवी चौक, कांगारपुरा, यशोधरा नगर, नागपूर) अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत,

तर

 1.लावण्य राणा

 2.गोपीनाथ भोक्ता (उडीसा) हे दोन आरोपी अद्याप फरार आहेत,
जप्त मालाची एकूण किंमत ₹8,44,900 रुपये असून त्यात 12 किलो गांजा, एक हॅपी ऑटो, ॲल्युमिनियम प्लेट्स व रॅक, एक बर्गमन मोपेड आणि मोबाईल फोन यांचा समावेश आहे. कारवाई पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस हवालदार पवन गजभिये यांच्या मिळालेल्या माहितीवरून करण्यात आली. या संपूर्ण कारवाईनंतर पारडी पोलीस ठाण्यात कलम 8(क), 20(ब)(2)(ब), 29 NDPS ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सध्या पुढील तपास NDPS पथकाकडून सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button