AmravatiLatest News

अंबानगरी भव्य भजन स्पर्धा २०२५

गिरीकल्प बहुउद्देशिय महिला विकास संस्था, अमरावती तसेच प्रिमिअर कॉर्पोरेशन अमरावती यांचे द्वारा आयोजित महिला भजन स्पर्धामध्ये शेकडोंच्या संख्येने ग्रामीण तसेच शहरी विभागातील महिला भजन मंडळानी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे आयोजक सौ. देवयानी ज्ञानेश्वर कुर्वे होते. या कार्यक्रमाचे आयोजन संत गाडगे बाबा महाराज सभागृह गाडगे नगर अमरावती येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये तिन महिला मंडळांना रोख बक्षिसे, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रथम पारीतोषीक रोख रक्कम रु.५०००/- व विशिष्ट पुरस्कार अंबाई महिला भजनी मंडळ यांना देण्यात आला यामध्ये सहभागी असणाऱ्या महिला १) सौ. संगीता वाटाणे, २) सौ. उषा सौदागर, ३) सौ. मालाताई सौदागर, ४) सौ. छायाताई मुंदाने, ५) सौ. मयुरी झोपटे, ६) सौ. सोनाली केवतकर, ७) सौ. पावडे, ८) सौ. तुफाडे, ९) सौ. शारदा पोहोकार, १०) सौ. सुनीता सौदागरे, ११) सौ. अनुराधा मुलनकर सहभागी होत्या. त्यानंतर महाकाली महिला भजनी मंडळ, वृंदावन कॉलनी अमरावती यांनी द्वितीय पारीतोषीक रोख रक्कम रु.२५००/- व विशिष्ट पुरस्कार मिळविले. यामध्ये सहभागी असणाऱ्या महिला १) सौ. शीला खंडारे, २) सौ. सुनीता काळे, ३) सौ. प्रतिभा राऊत, ४) सौ. अनुराधा पदवाड, ५) सौ. पुष्पा कांडलकर, ६) सौ. नलिनी खुळे, ७) सौ. विजया मेन, ८) सौ. सुषमा पिंजरकर होत्या. त्यानंतर तृतीय पारीतोषिक रोख रक्कम रु.२५००/- गुरुदेव महिला भजनी मंडळ यांना मिळाला त्यामध्ये सहभागी असणाऱ्या महिला १) सौ. शोभा साळवे, २) सौ. यमु जवंजाळ, ३) सौ नभु ठाकरे, ४) सौ. ममता मालवीय, ५) सौ. अरुण कोल्हे, ६) सौ. राधा वाट, ७) सौ. कोकिळा पाटील, ८) सौ. छाया राऊत, ९) सौ. मनोरमा मेटे यांना देण्यात आला.
विजेत्यांना बक्षिस वितरण मा.श्री. लप्पीसेठ जाजोदिया (उद्योगपती व ज्येष्ठ समाजसेवक) यांच्या हस्ते करण्यात आले. समारंभाचे अध्यक्ष मा.श्री. बळवंतराव वानखडे (खासदार अमरावती लोकसभा), उद्घाटक श्रीमती यशोमतीताई ठाकूर (माजी मंत्री), प्रमुख अतिथी मा.श्री सुनिलभाऊ देशमुख (माजी पालकमंत्री), मा. श्री बबलूभाऊ शेखावत (अध्यक्ष, शहर काँग्रेस कमिटी), मा.श्री विलासभाऊ इंगोले (माजी महापौर), मा.श्री मिलिंदभाऊ चिमोटे (प्रवक्ता, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी माजी महापौर, अमरावती), मा.श्री बबलूभाऊ देशमुख (अध्यक्ष, अमरावती जिल्हा ग्रामीण कॉग्रेस कमिटी), मा.श्री अशोकभाऊ डोंगरे (माजी महापौर, अमरावती), मान्यवर अतिथी मध्ये मा.श्री किशोरभाऊ बोरकर (सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी), मा.सौ. वंदनाताई कंगोले (माजी महापौर), मा.श्री रामेश्वरभाऊ अभ्यंकर (ज्येष्ठ समाजसेवक), मा.श्री. बाळासाहेब भूयार (माजी महापौर) उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button