AmravatiLatest News

संयुक्त संघर्ष कृती समितीची उच्च शिक्षण सहसंचालकांसोबत बैठकशिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी

अमरावती : संयुक्त संघर्ष कृती समिती तर्फे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत स्थानिक उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अभय खांबोरकर यांच्या दालनात बैठक पार पडली. बैठकीत शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणी यावेळी समितीतर्फे उच्च शिक्षण सहसंचालकांना करण्यात आली.
महाविद्यालयीन शिक्षकांच्या स्थान निश्चिती व वेतन निश्चिती बाबत कार्यवाही करणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतन प्रकरणांवर तोडगा काढणे, डीसीपीएस/एन. पी. एस. धारक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कपातीसंदर्भातील हिशेबाच्या पावत्या देणे, विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकबाकी व प्रलंबित सेवानिवृत्ती प्रकरणे तातडीने निकाली काढणे, विद्यापीठातून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपदानाची देय रक्कम तत्काळ मंजूर करणे, विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे रजारोखीकरण प्रकरणे तात्काळ निकाली काढणे, विद्यापीठातून सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ८०% ग्रॅज्युटी रक्कम तात्काळ अदा करणे, शासन निर्णय दिनांक २२ सप्टेंबर २०२४ अन्वये प्रयोगशाळा सहाय्यकांना लागू करण्यात आलेल्या ४२०० व ४३०० वेतनश्रेणींची अंमलबजावणी करणे आदी मागण्या सदर बैठकीत मांडण्यात आल्या. यावेळी उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अभय खांबोरकर यांनी देखील सर्व मागण्यांवर तातडीने कार्यवाही करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील, असे आश्वासन दिले. बैठकीला सहसंचालक कार्यालयातील प्रशासन अधिकारी डॉ. प्रभु दवणे, श्री. राठोड, सौ. पूजा बुल तसेच संयुक्त संघर्ष कृती समिती तर्फे अध्यक्ष डॉ. आर. डी. सिकची, सचिव डॉ. प्रवीण सूर्यवंशी, निमंत्रक श्री. अजय देशमुख, डॉ. संतोष ठाकरे, डॉ. नितीन चांगोले,डॉ. रविंद्र मुन्द्रे, श्री. राजाभाऊ बढे, श्री. नरेंद्र घाटोळ, डॉ. सुभाष गावंडे, डॉ. रॉय, श्री. शेख, श्री. विजय चवरे, श्री. संतोष मालधुरे, श्री. इंगोले उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button