विद्यापीठात संस्कृत भाषावबोधन वर्गाचा उत्साहात समारोप

अमरावती – (दि. 03.10.2025) : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्यावतीने विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहातील विविध विद्याशाखेतील विद्यार्थीनींसाठी राबविण्यात आलेल्या दहा दिवसीय संस्कृत भाषावबोधन वर्गाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थीनींना दहा दिवसात सोप्या व आनंददायी पध्दतीने संस्कृत भाषेत संभाषण, दैनंदिन वस्तूंची संस्कृत नावे, गाणी, श्लोक, प्रार्थना, संख्या, घड¬ाळातील वेळ, संस्कृत भाषेत कसे बोलावे आदींचे मार्गदर्शन करण्यात आले. अध्यक्षस्थानी विभागाच्या समन्वयक डॉ. संयोगिता देशमुख, प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ ज्ञानविज्ञान महाविद्यालयाच्या डॉ. रुपाली कविश्वर, आदर्श विद्यालयाच्या शिक्षिका डॉ. कीर्ती राम पिंजरकर, रसायनशास्त्र विभागाच्या डॉ. जागृती बारब्दे, राम पिंजरकर यांची उपस्थिती होती.
प्रा. रूपाली कविश्वर यांनी यावेळी संस्कृत भाषावबोधन वर्गाच्या यशस्वी आयोजनाबद्दल विभागाचे विशेष कौतुक विद्यार्थीनींना शुभेच्छा दिल्या. डॉ. कीर्ती पिंजरकर यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व अधोरेखित करताना संस्कृत भाषा ही भारतीय ज्ञानपरंपरेची जननी असून संस्कृत अभ्यासामुळे विद्याथ्र्यांच्या सर्वांगीण विकासाचे नवे दालन उघडत असल्याचे सांगितले. डॉ. जागृती बारब्दे यांनीही संस्कृत विभागाचे विशेष कौतुक करून असे उपक्रम अधिकाधिक घेण्यात यावेत, असे मत व्यक्त केले. राम पिंजरकर यांनीही विद्यार्थीनींना मोलाचे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणातून डॉ. संयोगिता देशमुख यांनी विद्यार्थीनीना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या.
सांस्कृतिक सत्रात विद्यार्थीनींनी मनमोहक असे सादरीकरण केले. विद्यार्थीनी अमृता कोरडे हिने स्वागतगीत सादर केले. रसायनशास्त्र शाखेतील विद्यार्थीनी तेजस्विनी तडसे, ज्ञानेश्वरी धोंगडे, गायत्री निवल यांनी “संस्कृत चमू” गीत सादर केले. समृद्धी कोमलवार व प्रतिक्षा मांडेकर या गृहविज्ञान शाखेच्या विद्यार्थीनींनी सुरस सुबोधा हे संस्कृत गीत पोवाडा चालीत सादर केले, तर आकांक्षा गर्वार्ले व पल्लवी काळे यांनी “विनोदकणिका”तून उपस्थितांचे मनोरंजन केले. या वर्गात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांमधील दिडेशेवर विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. गृहविज्ञान शाखेची विद्यार्थीनी समृद्धी कोमलवार, रसायनशास्त्र विद्या शाखेची विद्यार्थीनी सानिका जोशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रास्ताविक प्रा. स्वप्ना यावले, पाहुण्यांचा परिचय प्रा. प्रियंका मोहोड यांनी करून दिला, तर उत्कृष्ट सूत्रसंचालनाची जबाबदारी प्रा. श्वेता अशोक बडगुजर यांनी पार पाडली. प्रा. आकाश हरणे यांनी आभारप्रदर्शन केले. घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थिनींना दोन क्रेडिट प्रदान करणारी प्रमाणपत्रे आभासी पध्दतीने प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांतील विद्यार्थी-विद्यार्थीनी, प्राध्यापकवंृद, अधिकारी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते. शांती मंत्राने कार्यक्रामाची सांगता झाली.



