महागाईवर दिलासा, व्याजदरात बदल नाही! RBI च्या MPC बैठकीतील 5 महत्त्वाचे निर्णय

मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मुद्रांक धोरण समितीची (MPC) बैठक नुकतीच पार पडली असून, यामध्ये सामान्य नागरिक, गृहकर्जदार, गुंतवणूकदार आणि उद्योगजगतासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी या निर्णयांची माहिती दिली आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, म्हणजेच बँकांचे कर्जाचे व्याजदर तात्पुरते स्थिर राहतील. यासोबतच GDP ग्रोथ आणि महागाई दर यासंबंधी अंदाज, तसेच रुपयाच्या आंतरराष्ट्रीय वापराबाबतही काही ठळक पावलं उचलण्यात आली आहेत.
MPC बैठकीतील 5 महत्त्वाचे मुद्दे:
१ . रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही
आरबीआयनं सलग दुसऱ्यांदा रेपो रेट 5.50% वर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा थेट परिणाम बँकेच्या गृहकर्ज, वाहन कर्जाच्या EMI वर होतो. सध्या तरी कर्जदारांसाठी दिलासा कायम.
२. GDP ग्रोथ रेट वाढवला
आर्थिक वर्ष 2025-26 (FY26) साठी GDP ग्रोथचा अंदाज 6.5% वरून वाढवून 6.8% केला आहे. म्हणजेच भारताची अर्थव्यवस्था पूर्वीच्या अंदाजापेक्षा वेगाने वाढेल, असा विश्वास RBI ला आहे.
३. महागाई दरात कपात
FY26 साठी महागाई दर 3.1% वरून घटवून 2.6% करण्यात आला आहे. याचा अर्थ, महागाई काही प्रमाणात आटोक्यात राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे, जे सर्वसामान्यांसाठी सकारात्मक आहे.
४. रुपयाचं आंतरराष्ट्रीयीकरण
भूटान, नेपाळ आणि श्रीलंकेतील बँकांमध्ये आता NRI (अनिवासी भारतीय) रुपयांमध्ये कर्ज घेऊ शकतील. यामुळे रुपयाचा आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये वापर वाढण्याची शक्यता आहे.
५. कर्ज मर्यादांमध्ये मोठी वाढ
शेअर्सवरील कर्ज मर्यादा: ₹20 लाखांवरून वाढवून ₹1 कोटी
IPO फायनान्सिंग: प्रति व्यक्ती ₹10 लाखांवरून वाढवून ₹25 लाख
लँडिंग आणि विम्याच्या मर्यादांमध्ये सुधारणा करण्याचे संकेत
काय म्हणता या निर्णयांवर?
सध्या कर्ज घेतलेल्या लोकांना थोडासा दिलासा मिळाला असला तरी, भविष्यात RBI कडून काय धोरणात्मक बदल होतात, याकडे गुंतवणूकदारांचं आणि गृहकर्जदारांचं लक्ष लागून राहील.



