नवदुर्गोत्सवाच्या पावन पर्वावर भाजपा नेत्या व स्टार प्रचारक मा. खा. सौ.नवनित राणा यांनी केली महाआरती, झाल्या रासगरब्यामध्ये सहभागी

भाजपा नेत्या व स्टार प्रचारक मा.खासदार सौ.नवनित रवि राणा यांनी नवदुर्गोत्सवाच्या पावन पर्वावर अमरावती शहरातील व ग्रामीण भागातील मंडळाला दिल्या सदिच्छा भेटी देऊन केली महाआरतीद व रासगरब्यामध्ये झाल्या सहभागी
मंडळाव्दारे आयोजित महाप्रसादाचे मा.खासदार नवनित रवि राणा यांनी केले वाटप
कांमुजा, मुऱ्हादेवी अंजनगाव सुर्जी, दर्यापुर, व्हि.एम.व्ही कॉलेज, संतोषी नगर, हिंदुस्थान हॉटेल चित्राचौक, गांधी चौक, ओसवाल भवन, बडनेरा रोड येथे द रासगरबा, देवरणकर नगर, पार्वती नगर, व्हाईट हाऊस, चरीचंद्र लॉन इत्यादी ठिकाणी मंडळ व रासगरब्यांचा समावेश
अमरावती – संपूर्ण अमरावती जिल्हयासह विदर्भामध्ये महादुर्गेचे आगमन झाले असून विविध मंडळाव्दारे दुर्गामातेची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. व रासगरब्याचे सुध्दा आयोजन करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही भाजपा नेत्या व स्टार प्रचारक माजी खासदार सौ.नवनित रवि राणा यांनी शहरातील मंडळाना सदिच्छा भेटी देवुन मंडळामध्ये महाआरती केली. व अनेक ठिकाणी आयोजित रासगरब्यामध्ये सहभागी होऊन आनंद घेतला.
त्याचप्रमाणे अनेक मंडळाव्दारे महाप्रसादाचे आयोजन सुध्दा करण्यात आले होते. या महाप्रसादाचे वाटप मा.खासदार नवनित राणा यांनी केले.
यामध्ये कामुंजा येथील महाप्रसाद, मुऱ्हादेवी अंजनगाव सुर्जी येथील देविचे दर्शन, आशा मनिषा देवी दर्यापुर, इच्छापुर्ती देवी माता मंदिर दर्यापुर, शक्ती दुर्गोत्सव मंडळ व्ही.एम.व्ही कॉलेज, विर अभिमन्यु दुर्गोत्सव मंडळ संतोषी नगर, तसेच चित्रा चौक हॉटेल हिंदुस्थान मध्ये आयोजित रासगरब्याला उपस्थिती, पंचदिप दुर्गोत्सव मंडळ गांधी चौक, ओसवाल भवन येथील रासगरब्यामध्ये सहभागी, देवरणकर नगर येथील जनार्दन स्वामी दुर्गोत्सव मंडळाला भेट, पार्वती नगर येथील रासगरब्यामध्ये विशेष उपस्थिती, बडनेरा रोड वरील व्हाईट हॉऊस मधिल आरंभ गरब्याला भेट, हरीचंद लॉन येथील रासगरब्याला भेट, बडनेरा रोड येथे द रासगरब्यामध्ये सहभागी घेतला व यासह अनेक मंडळाला सुध्दा त्यांनी सदिच्छा भेटी दिल्या आहे.



